Ad will apear here
Next
‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान


मुंबई :
‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.

खुला प्रवर्गात इंडी डिझाइनच्या पूल मॅगझीन, डिझाइन फॉर क्राफ्टमध्ये सैफ फैजल डिझाइन वर्कशॉपच्या बिद्रीवेअर कलेक्शन, टेक्सटाइल डिझाइनमध्ये टॉइल इंडिएनच्या टॉइल इंडिएन कलेक्शन, डिझाइन थिंकिंगच्या ग्रीनसोल या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आला. फर्निचर आणि इंटिरियर अॅक्सेसरीजमध्ये सिद्धार्थ सिरोहीच्या बारो फर्निचर कलेक्शनला, उत्पादन डिझाइन विभागामध्ये डिझाइन डायरेक्शन्स प्रा. लि.च्या आयब्रेस्ट एक्झाम, पॅकेजिंग डिझाइनमध्ये एलिफंट डिझाइन प्रा. लि.च्या फ्रूट ज्यूसेसची पेपरबोट श्रेणी, सार्वजनिक युटिलिटीसाठी डिझाइनमध्ये वेंकटरमणन असोसिएट्सच्या चर्च स्ट्रीटचा पुनर्विकास प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले.

परीक्षकांच्या निवडीच्या पुरस्कारमध्ये अक्षयपात्र फाउंडेशनच्या शिक्षणासाठी अमर्यादित जेवण, पीकेबी वेस्ट सोल्यूशन्स प्रा. लि.च्या डेली डंप-कचरा दृश्य आणि सुंदर बनवणे या प्रकल्पाला पुरस्कार देण्यात आला. डिझाइन हाऊस ऑफ दि इयर विभागामध्ये एलिफंट डिझाइन प्रा. लि.च्या फ्रूट ज्यूसेसची पेपरबोट श्रेणी या प्रकल्पाला, तर सर्वोत्तम विद्यार्थी प्रकल्प विभागामध्ये गौतम रेड्डी एनआयडी यांच्या ऑसमस- सेल्फ वॉटरिंग प्लांटर या प्रकल्पाला पुरस्कृत करण्यात आले.

‘लेक्सस’ने डिसेंबर २०१७मध्ये पुरस्कारांची घोषणा आणि प्रवेशिकांसाठी आवाहन केले होते. व्यावसायिक डिझाइन समुदायाकडून २६८ आणि ४३९ प्रवेशिका विद्यार्थ्यांकडून अशा एकूण ७०७ प्रवेशिका प्राप्त झाल्या.  

‘लेक्सस’चे अध्यक्ष पी. बी. वेणुगोपाळ म्हणाले की, ‘आम्ही पहिल्या लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडियामुळे खूप रोमांचित झालो आहोत. प्रवेशिकांची संख्या आणि दर्जा या दोन्ही गोष्टी आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहेत. या प्रवेशिका लेक्सस ब्रँड उभा असलेल्या कल्पनाशक्ती, कारागिरी आणि डिझाइन यांचे खर्‍या अर्थाने प्रतिबिंब आहेत.’

असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) यांनी सुरू केलेल्या पुणे डिझाइन फेस्टिव्हलदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात विजेत्यांना ख्यातनाम मायकेल फोली यांनी विशेषरित्या डिझाइन केलेली ट्रॉफी देऊन पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय, विजेते डिझाइन प्रोटोटाइप बंगळुरू, गुरगाव, मुंबई आणि नवी दिल्ली येथील लेक्सस गेस्ट एक्स्पिरियन्स सेंटर्समध्ये प्रदर्शित केले जाईल, लेक्सस इंडियाच्या समाजमाध्यमांद्वारे त्याला अधिक प्रसिद्धीही दिली जाईल.

‘एलडीएआय’चे परीक्षण नीलम छिब्बर यांच्या अध्यक्षतेखालील डिझाइन उद्योगातील तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZQQBL
Similar Posts
‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड’साठी प्रवेशिका नोंदणी सुरू मुंबई : लेक्सस इंडियाने प्रतिष्ठित ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’च्या (एलडीएआय) दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. उत्तम भविष्याची निर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख व प्रख्यात डिझाइनर्स व क्रिएटर्ससाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’साठी अर्ज व प्रवेशिका सुरू झाल्या आहेत
‘लेक्सस’ची हायब्रीड इलेक्ट्रिक एसयुव्ही दाखल मुंबई : ‘लेक्सस इंडिया’ने आपल्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एनएक्स ३०० एच’ ही आधुनिक हायब्रिड इलेक्ट्रिक एसयूव्ही कार भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे.
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language